प्रतिधि शैक्षणिक शिष्यवृत्ती लाभार्थ्यांचा सत्कार
September 30,2025
नागपूर : प्रतिधि या शैक्षणिक शिष्यवृत्ती कार्यक्रमात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी नुकताच ठाणे येथे सत्कार केला. या उपक्रमाअंतर्गत देशभरातील 5,000 मुलांपर्यंत शिक्षणाची मदत पोहोचली आहे, ज्यात दिव्यांग मुलांचा समावेशही आहे. शालेय शिक्षणात पुढे जाण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि मार्गदर्शन मिळत असून, आतापर्यंत 7 शहरांतील 7,800 मुलांना हा उपक्रम लाभ झाला आहे. यावेळी अमेझॉन इंडियाच्या ऑपरेशन्स (पश्चिम) संचालक गीता उप्पल उपस्थित होत्या.