चित्रा वाघ यांना पोलिस संरक्षण द्या : सुधीर मुनगंटीवार

March 06,2021

मुंबई, 6 मार्च : पूजा चव्हाण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणार्‍या भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना वारंवार धमक्या येत असून, त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला जात आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ राज्य सरकारने पोलिस संरक्षम द्यावे, अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांंनी विधानसभेत केली.

पूजा चव्हाण या मुलीने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणी राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने सदर प्रकरण चित्रा वाघ यांनी लावून धरले होते. यामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राठोड प्रकरणी सरकारला आणि शिवसेनेला जेरीस आणल्याने चित्रा वाघ यांच्या पतीवर जुने कुठलेतरी प्रकरण उकरून कराढून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतरही वाघ मागे हटल्या नाहीत. त्यामुळे त्यांना आता धमक्या देण्याचा प्रकार चालवला आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यााठी त्यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी मुनगंटीवार यांनी सभागृहात केली.