चीनला धडा शिकवण्याच्या तयारीत अमेरिका

May 22,2020

न्यूयॉर्क, 22 मे - चीनने जगभर कोरोनाचा प्रसार करून जगाला मोठ्या संकटात लोटले आहे. यामुळे जगभरातील अर्थव्यवस्था ठप्प झाल्या आहेत. अशा स्थितीत चीनला धडा शिकविण्यासाठी अमेरिका चीनचे 11 ट्रिलियन डॉलरचे कर्ज परत  न करण्याचा निर्णय घेऊ शकेल, अशी धमकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी ही धमकी दिली. चीनचे कर्ज न देता चीनची अमेरिकेत असलेली मालमत्ता गोठविण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो, असे ट्रम्प यांनी सांगितले. कोरोनाच्या प्रसाराला चीनच पूर्णपणे जबाबदार असून, त्याने संपूर्ण जगाला वेठीला धरले आहे. त्याचा बदला म्हणून अमेरिकेवर असलेले चीनचे 2.1 ट्रिलियन डॉलरचे कर्ज  परत न करण्याचा निर्णय कदाचित घेईल, असे राष्ट्राध्यक्षांनी सांगितले. चीनचे कर्ज परत करण्यासारखी स्थिती सध्या अमेरिकेची नाही जर अमेरिका कर्ज परत करू शखली नाही तर ती नादार ठरेल. त्यामुळे मोठी नामुष्की येऊ शकते. यावर उपाय म्हणून राष्ट्राध्यक्ष आपल्या अधिकारात चीनचे कर्ज नाकारून त्या देशाची संपत्ती गोठवू शकतात. मात्र अन्य देशांची देणी अमेरिका देत राहिली तर ही नादार ठरणार नाही.

ट्रम्प यांनी यापूर्वीही चीनमध्ये अमेरिकन कंपन्यांनी गुंतवणूक करू नये, असे आदेश दिल होते. मात्र त्यांनी ऊर्जाविषयक उपकरणे आयात करण्यावरील बंदी उठविली आहे. मार्च महिन्यापर्यंत अमेरिकेत 58 साथींमध्ये आर्थिक आणीबाणी लागू झाली. त्यापैकी 31 अद्यापही लागू आहेत. या कारणामुळे ट्रम्प असे पाऊल उचलू शकतील, असे मत अनेक अमेरिकन तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.