नागपुरात कोरोनाचा उद्रेक सुरूच २४ तासात ७१० बाधित, ८ रुग्णांचा मृत्यू

February 22,2021

नागपूर : २२ फेब्रुवारी - नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप  इतका वाढला असून राज्यशासनाने कडक निर्बंध लादले आहे. ७ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये तसेच आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश आज देण्यात आले. गेल्या २४ तासात ७१० कोरोना बाधित रुग्ण आढळले असून ८ जणांचा मृत्यू  झाला आहे. ४३७ रुग्ण कोरोना मुक्त झाले. 

गेल्या २४ तासात नागपुरात ७१० कोरोना  बाधित रुग्ण आढळले असून ६४१ रुग्ण शहरातील तर ६७ रुग्ण ग्रामीण भागातील तर २ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. कोरोना बाधितांचा आकडा १४३८६३ झाला आहे. २४ तासात ८ मृत्यू झाले असून ४ मृत्यू शहर २ ग्रामीण २ इतर जिल्ह्यातील आहेत. आतापर्यंत नागपुरात ४२८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४३७ बाधित रुग्ण आज कोरोना मुक्त झाले  कोरोनमुक्तीची संख्या १३३२९८ असून रिकव्हरी रेट ९२.४७ झाला आहे. २४ तासात ५९३८ चाचण्या झाल्या असून त्यात शहरातील ४४८० तर ग्रामीण भागातील १४५८ चाचण्या झाल्या.