नागपूरकरांना थोडा दिलासा बाधित रुग्णांची संख्या हजारांवरून पोहोचली ५९० वर

September 27,2020

नागपूर : २७ सप्टेंबर - राज्याच्या उपराजधानीत कोरोनाचा कहर सुरु असतानाच रविवारी मात्र मोठा दिलासा मिळाला. बऱ्याच दिवसांनंतर ५९० बाधित रुग्ण आढळले तर १६५० रुग्णांची कोरोनामधून मुक्तता झाली. तर ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

गेल्या आठवडाभर शहरात बाधित रुग्णांची संख्या हजाराच्या वर पोहोचली होती मात्र दोन दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या रोडवल्यामुळे नागपूरकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. आज ५९० बाधित रुग्ण आढळले असून एकूण बाधित रुग्णांची संख्या ७४८२१ वर पोहोचली आहे. तर १६५० रुग्ण कोरोना मुक्त झाले कोरोनमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५८२६६ झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.८७ टक्के झाले आहे. आज ४३ रुग्णांचे मृत्यू झाले असून त्यात २८ रुग्ण शहरातील ११ रुग्ण ग्रामीण भागातील तर ४ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. एकूण मृत्युसंख्या २३८३ वर पोहोचली आहे. आज शहरात २९६९ चाचण्या झाल्या त्यात ३९८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या शहरात १४१७२ बाधित   रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून त्यात ३६२४ ग्रामीण मधील तर १०५४८ रुग्ण शहरातील आहेत.