रामनामाच्या जपाने नागपूर दुमदुमले

August 05,2020

नागपूर : ५ ऑगस्ट - अयोध्येतील राममंदिर हे हिंदुस्तानातील प्रत्येक नागरिकांचे स्वप्न होते या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजन करण्यात आले. हा अनुभव सर्वांनी अनुभवला राज्याच्या उपराजधानीत चौकाचौकांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन रामनामाचा जयघोष करण्यात आला. 

त्यानिमित्ताने नागपूरचा बदकास चौक , संघ मुख्यालय, इतवारी , लक्स्मीभूवन चौक, प्रतापनगर चौक येथे आज रामभक्तांनी विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन रामनामाचा जप केला तर कुठे रामरक्षा स्तोत्र पठाण करण्यात आले. संपूर्ण नागपूर आज भगवेमय झाले होते. चौकात भगवे झंडे , जय श्रीराम लिहिलेले फलक झडकत होते. नागपुरातील लोकांनी पेढे व मिठाई वाटून आनंद साजरा केला.  भूमिपूजनाचे औचित्य साधून दक्षिण नागपुर विधानसभा मतदार संघातील मुख्य चौक, मंदिरे तसेच विविध ठिकाणी आरती, भजन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मा.आ. मोहनजी मते यांच्या हस्ते प्रभु श्री रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण तसेच ३ ते ४ हजार लाडुचे वितरण करण्यात आले. या वेळी नागरीकांमध्ये एक वेगळाच उत्साह , प्रसन्नता व आनंदाचे वातावरण होते. दक्षिण नागपूरातील मानेवाडा चौक , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक , नंदनवन चौक , सक्करदरा चौक , नरेंद्र नगर चौक ,शारदा चौक , हनुमान नगर , अयोध्या नगर चौक , जानकी नगर चौक , उदय नगर चौक, महात्मा गांधी चौक , चिटणीस नगर चौक , व दक्षिण नागपूर मधील विविध ठिकाणी प्रभू श्री राम च्या मंदिराच्या भुमीपूजनाच्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. मुख्य चौका चौका मध्ये पुष्पवर्षाव व आतीषबाजी, पताका ने नागरिकांचे लक्ष वेधले ,प्रभू श्री रामचंद्र यांच्या सुरेख भजनाने दक्षिण नागपूर मधील वातावरण भक्तीमय झाले. 'जय श्री राम' च्या जयघोषाच्या मार्फत आ.मोहन मते, आमदार दक्षिण नागपूर यांनी नागपूरातील  नागरीकांना भव्य मंदिर निर्माण भूमिपूजन सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.