बिग बी अमिताभ बच्चन देखील आता कोरोना निगेटिव्ह

August 02,2020

मुंबई : २ ऑगस्ट - महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगिटिव्ह आली आहे. त्यांना आजच घरी देखील सोडण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन यांना थोड्याच वेळात नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. यामुळे  त्यांचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. याआधी अमिताभ यांची सुन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांचा देखील कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे बच्चन कुटुंबावर असलेलं कोरोनाचं संकट दूर होऊ लागलं आहे.

11 जुलै रोजी अमिताभ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या या तिघांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर जया बच्चन, मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.