पाळण्याचा फास लागल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

August 01,2020

नागपूर : १ ऑगस्ट - पाळण्यावर गोल फिरतांना   गळफास लागल्यामुळे एका १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. श्रुती प्रकाश गजभिये असे मृतक विद्यार्थिनीचे नाव असून ही  आठव्या वर्गात शिकत होती. काल रात्री पाळण्यावर झोका घेत असताना अचानक झोक्याचा दोर गोल फिरला आणि श्रुतीच्या गळ्याला गळफास बसला. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.