सहायक पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 31,2020

नागपूर : ३१ जुलै - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक रमेश खाडे याच्याविरुद्ध  आज एका लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारदार हा एक ट्रॅक्टर चा मालक असून रेतीवाहतुकीचे काम करतो. रेतीवाहतुकीकरिता रमेश खाडेने १० हजार रुपयाची लाच मागितली होती. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची गंभीर दाखल घेऊन पोलीस  निरीक्षक निलेश सुरडकर  प्रकरणाचा तपस करून गुन्हा दाखल केला.