जमावाने केली पोलिसांवर दगडफेक

July 16,2020

वाशीम : १६ जुलै - कोरोना संसर्ग आजराच्या रुग्णात वाढ होत असून, शहरातील खाटीकपुरा, गवळीपुरा या भागातही रुग्ण आढळले. त्यामुळे सदर परिसर हा कंटेन्टमेंट झोन म्हणुन घोषीत करण्यात आला. त्यामुळे या भागातील सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले. मात्र, या आदेशाला झुगारुन काही लोक मांस विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी याबाबत विचारणा केली असता जमावाने पोलिसांच्या अंगावर चालून जाऊन दगडफेक केली. या दगडफेकीत दोन होमगार्ड सैनिक जखमी झाले असून, त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

   14 जुलै रोजी सकाळी 8.30 च्या दरम्यान गवळी पुर्यातील काही महिला व युवकांनी कंन्टेमेंट झोनमधुन आम्हाला जाऊ देण्यात यावे, असा आग्रह धरला. पोलिसांनी या झोनमधुन अत्यावश्यक कामाशिवाय जाणेयेणे शक्य करता येणार नसल्याचे सांगितल्यावरुन पोलिसांनी शुल्लक बाचाबाची झाली. याबाबत तैनात पोलिस कर्मचार्यांनी शहर पोलिस स्टेशनला मोबाईलद्वारे माहिती दिल्याने शहर पोस्टेच्या ठाणेदार योगिता भारद्वाज ह्या मोजक्या कर्मचार्यांना सोबत घेऊन संबंधित लोकांना समजावून सांगितले व वातावरण शांत झाले. मात्र, कन्टेंमेंट झोन असतांना देखील खाटीक लोक उघड्यावर मटन विक्री करुन गर्दी जमवित असल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे पोलिसांनी संबंधित लोकांना कन्टेंमेंट झोनमध्ये आपण मटन विक्री करीत आहात. हा गंभीर गुन्हा असल्याने मटन विक्रीस अटकाव केला. यावेळी खाटीक पुर्यातील घरांवरुन दगडफेक करण्यात आली.