एअर इंडिया देणार कर्मचाऱ्यांना ५ वर्षाची बिनपगारी रजा

July 16,2020

नवी दिल्ली, १६ जुलै : एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांपासून ६० महिने म्हणजेच ५ वर्षांपर्यंत बिनापगारी सुट्टीवर पाठविण्याची तयारी केली आहे. यासाठी एअर इंडिया बोर्डाची परवानगी मिळाली आहे.

बोर्डाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर यांनी एअर इंडियाच्या काही कर्मचाऱ्यांना बिनापगारी पाच वर्षांपर्यंत सुट्टीवर पाठविण्याची परवानही दिली आहे. या योजनेअंतर्गत एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांपासून ते 60 महिन्यांपर्यंतची विनापगारी सुट्टी वाढवता येऊ शकते.

अधिकृत आदेशानुसार एअर इंडियाच्या सीएमडी राजीव बंसल आता कर्मचाऱ्यांना 6 ते 2 वर्षांसाठी सुट्टीवर (बिनापगारी) पाठवू शकतात. हा अवधी 5 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. सांगितले जात आहे की एअरलाइनवर आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. केंद्र सरकार एअरलाइला विकण्याच्या प्रयत्न करीत असताना एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे. सध्या एअरलाइनची विक्रीची प्रक्रिया कोरोनाच्या महासाथीमुळे अडकली आहे.

चांगलं काम न करणाऱ्या  कर्मचाऱ्यांना ही बिनपगारी सुट्टी दिली जाऊ शकते. यासंदर्भात व्यवस्थापन तीन स्तरावर कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन करणार आहे. त्यानंतर कोणत्या कर्मचाऱ्यांना बिनपगारी सक्तीची रजा द्यायची हे ठरविण्यात येईल.