मुसळधार पावसाने मंगरुळपीर तालुक्यात जनजीवन विस्कळीत

July 16,2020

वाशिम : १६ जुलै - मंगरुळपीर तालुक्यात दीड तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांच्या दुकानात पाणी शिरलं तर शेलूबाजार पोलीस चौकी आणि बुलढाणा अर्बन बँकमध्ये पाणी शिरलं. गेल्या एका तासापासून औरंगाबाद-नागपूर महामार्गावर शेलू जवळच्या नाल्याला पूर आल्याने वाहतूक बंद झाली. पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरु होईल, मात्र तोपर्यंत वाहनचालकांना पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागेल.