अकोला जिल्ह्यात प्रमुख नद्यांना आला पूर

July 16,2020

अकोला : १६ जुलै - अकोला जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची रिप-रिप सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांन पूर आला आहे. जिल्ह्यातील पूर्णा, काटेपूर्णा, मोर्णा, विद्रूप, मन, महेशा या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अकोला शहरातील मोर्णा नदीही दुथडी भरून वाहतेय. यासोबतच काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसानं जिल्ह्यातील पाच प्रमुख जलाशयाच्या जलसाठ्यातही मोठी वाढ झालीये. दरम्यान, पावसामुळे बोर्डी नाल्याला मोठा पूर आल्याने शहरालगतच्या अमानतपूर ताकोडा गावात मोठं नुकसान झालंय. यात काही घरांची ही पडझड झाली आहे.

आज सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने अकोला जिल्ह्यातील अनेक नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. अकोला शहरातील मोर्णा नदीला पूर आला असून सध्या नदी दुथडी भरुन वाहत आहे.