बुलढाण्यात आळसना गाव ठरले हॉटस्पॉट

July 05,2020

बुलडाणा: 5जुलै - बुलडाणा जिल्ह्यात  पहिल्यांदाच आज २२ रुग्ण आढळल्यामुळे एकाच खळबळ माजली.  त्यात शेगाव तालुक्यातील आळसना या एकट्या गावात 12 पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाचा नवा हॉटस्पॉट समोर आला आहे.

आळसना या गावातील कोरोना आकडा आता 27 वर पोहोचला आहे. तर जिल्ह्यातील शनिवारच्या 278 आकड्यामध्ये 22 ची भर पडून आता एकूण संसर्गित रुग्णांची संख्या 300 वर पोहोचली आहे.

रविवारी सकाळी मिळालेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये जामठी धाड येथे 2, चिखली इंदिरा नगर भागात एक, आळसना 12, नांदुरा 2, जळगाव जामोद 1, टेंभुर्णा (खामगाव) 1, सुल्तानपूर 2 आणि मलकापूर हनुमान नगरमधील 24 वर्षीय तरुणी असे 22 जण आहेत.

आळसना या गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हे गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. आज सापडलेले 12 नवीन कोरोनाबाधित रुग्ण कोणाकोणाच्या संपर्कात आली आहेत काय, याची पडताळणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. समूह संसर्गाला थांबवायचे असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. मास्क वापरा, हात वेळोवेळी धुवा, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. कोरोनाबाधित रुग्ण संख्येने मुंबईसह संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 7074 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्येने दोन लाखांचा टप्पा पार केला आहे. राज्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 2,00064 आहेत. तसेच 24 तासांत 295 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनानं 8671 जणांचा बळी घेतला आहे.