इमिटेशन ज्वेलरी उद्योगाची नोंदणी एमएसएमई मध्ये करा नितीन गडकरी

July 04,2020

नागपूर, 4 जुलै - इमिटेशन ज्वेलरी उद्योगांनी एमएसएमईमध्ये नोंदणी करून या विभागात यावे या उद्योगाच्या क्ल्सटरसाठी आम्ही राष्ट्रीय महामार्गाशेजारी जागी उपलब्ध करून देऊ. एमएसएमई स्टॉक एक्स्चेंज अंतर्गत येणार्‍या उद्योगांना  परकीय गुंतवणूकही उपलब्ध होईल. असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

इमिटेशन ज्वेलरी निर्माता उद्योजकांशी गडकरींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. या उद्योगातील शेकडो उद्योजक यावेळी ऑनलाईन उपस्थित होते. आज या उद्योगांना लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात केला जातो. ती आयत बंद व्हावी किंवा कमी व्हावी अशी मागणी या उद्योजकांनी यावेळी केली. यावर गडकरी यांनी आपण निवेदन द्यावे. मी कच्चा मालावर आयात शुल्क लावण्याबाबत वाणिज्य मंत्रालयाकडे प्रयत्न करीन, असे आश्‍वासन दिले.

एमएसएमईच्या स्फूर्ती योजनेत आम्ही उद्योगाचे लहान क्लस्टर तयार करीत आहोत. या योजनेत इमिटेशन ज्वेलरी उद्योजकांनी नोडेंदणी करून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केले. याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले की, आपल्या क्षेत्रात गेल्या 10 वर्षांपासून दागिने तयार करणार्‍या एका व्यक्तीला मास्टर ट्रेनर बनवा व त्याच्याकडून 10-10 कौशल्यप्राप्त कारागिर तयार करा. संशोधन, उच्च तंत्रज्ञान, कौशल्य, नवीन मशिनरी, नवीन संशोधन याद्वारे उत्पादित वस्तूची किंमत कमी करमे शक्य होईल. एमएसएमईच्या फंडस ऑफ फंडस योजनेत आम्ही ज्या उद्योगांचा जीएसटी रेकॉर्ड आयकर व बँक रेकार्ड चांगला आहे. अशा उद्योगांचे रेटिंग करून त्यांना एमएसएमई स्टॉक एक्स्चेंजमध्ये घेणार आहोत यातून त्यांना परकीय भागभांडवल उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.