कारखान्यातील स्फोटात एक ठार, 5 जखमी

May 24,2020

नागपूर, 24 मे - नागपूर नजीकच्या कोंढाळी येथून 13 किमी अंतरावरील बाजारपेठ परिसरातील शिवा-सावंगा येथील इकॉनॉमिक्स स्फोटक कंपनीत सेल्फ फिलिंग डी-5 प्लांटमध्ये भयंकर स्फोट झाला. यात एका कामगाराचा मृत्यू झाला  असून 2 गंभीर जखमी तर 3 जखमी झाले आहे. जखमी पाचही कामगारांवर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, यांनी भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे  सांत्वन केले. प्राप्त माहितीनुसार, शिवा-सावंगा इकॉनॉमिक्स स्फोटक कंपनीत डिटेनेटर डी-5 सेल्फफिलिंग प्लांटमध्ये डेटोनेटर फिलिंग करीत असताना स्फोट झाला. यात काम करणार्‍या सहा कामगारापैकी प्रितेश जैदगुडे रा.  सावंगा याचा नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर भूषण बेहाडे, दत्तू बागडे, व शिवा हे गंबीर जखमी आहे तर भूषण पूंड, मुकेश धुर्वेे, नितेश उके हे जखमी असून नागपूरच्या राठी हॉस्पिटल धंतोली येथे उपचार सुरू  आहेत.