सरसंघचालकांबद्दलच्या दुष्प्रचाराबाबत कठोर कारवाईची संघाची मागणी

May 21,2020

नागपूर, 21 मे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या विरोधात सोशल मीडियावर होत असलेल्या दुष्प्रचारासंदर्भात संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित प्रकरणाची संघ चौकशी करत आहे. पोलिस  कारवाई करण्याचादेखील विचार सुरू आहे. अशा प्रकारे अफवा पसरविणार्‍यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे असे मत संघाचे सहप्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या संकटामुळे धर्माप्रति असल्याची माझी आस्था संपली आहे. असे भागवतांनी वक्तव्य केल्याचा खोटा प्रचार-प्रसार काही तत्वांकडून करण्यात येत आहे. यात काहीच तथ्य नाही. समाजात भ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न चालू आहे. यासंदर्भात काल संघाचे सहप्रचारप्रमुख नरेंद्र कुमार यांनी ट्विट करून चिंता व्यक्त केली, सरसंघचालकांनी असे कुठलेही वक्तव्य केलेले नाही. समाजात तेढ निर्माण करणारे तत्व या माध्यमातून स्वतःचे लक्ष्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजात अनास्था, अराजक्ता निर्माण व्हावी यासाठी हे षडयंत्र रचण्यात येत असल्याचे ते म्हणाले.