वाहतूक जागरूकता अभियानांतर्गत वाहनचालकांना हेल्मेट वाटप
March 28,2026
नागपूर : वाहतूक जागरूकता अभियानांतर्गत शहरातील संविधान चौक येथे मॅक्स केअर हॉस्पिटल, मॅक्स हेल्थ केअर आणि नागपूर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. शुक्रवार, 27 मार्च 2026 रोजी दुपारी आयोजित या उपक्रमात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना हेल्मेट देत त्यांना नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डीसीपी वाहतूक लोहित मतानी उपस्थित होते. Traffic Awareness Campaign तसेच मॅक्स केअर हॉस्पिटल व मॅक्स हेल्थ केअरचे अधिकारी अनुराग नायक, हर्षल वंजेकर तसेच नागपूर रस्ते वाहतूक सुरक्षा विभागाचे कौस्तुभ आगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.






