नवीन डिझाइन, अपग्रेडेड इंटीरियर आणि आधुनिक वैशिष्ट्यांसह महिंद्राने नवीन बोलेरो सादर केली

October 07,2025

07 ऑक्टोबर 2025: भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज बोलेरोची नवीन श्रेणी सादर केली. नवीन बोलेरोची किंमत ₹7.99 लाखांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते तर नव्याने सादर केलेल्या टॉप-एंड B8 प्रकाराची किंमत ₹9.69 लाख (एक्स-शोरूम) आहे. नवीन बोलेरो निओची किंमत ₹8.49 लाखांपासून (एक्स-शोरूम), आणि नवीन टॉप-एंड प्रकार N11 ची किंमत ₹9.99 लाख (एक्स-शोरूम) आहे. या लाँचसह, बोलेरो श्रेणी सौंदर्यशास्त्र, अधिक आरामदायी प्रवास आणि आधुनिक वैशिष्ट्यांसह तिचे आकर्षण कायम ठेवते आहे.

25 वर्षांचा वारसा आणि 16 लाखांहून अधिक समाधानी ग्राहकांसह, बोलेरो ही एक वैविध्यपूर्ण एसयूव्ही आहे. शहरातील गजबजलेल्या रस्त्यांपासून ते खडकाळ ग्रामीण लँडस्केपपर्यंत विविध भूप्रदेशांमध्ये तिचा वावर सहज असतो. कारण, कोणत्याही भूप्रदेशांत सहज ऍडजस्ट होईल अशी तिची अनुकूलता आहे. आणि यामुळेच ती ग्राहकांसाठी मौल्यवान आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनीकांत गोल्लागुंटा म्हणाले, “काळाच्या कसोटीवर बोलेरोने स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळेच 25 वर्षांहून अधिक काळ भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण आणि मजबूत एसयूव्हींपैकी एक म्हणून तिने आपले स्थान निश्चित केले आहे. या चिरस्थायी वारशाच्या पायावर नवीन बोलेरो गतिमान आणि वेगाने विकसित होणाऱ्या नवीन भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन केली गेली आहे. कणखरपणा, आधुनिक रचना, वाढीव आराम आणि आधुनिक वैशिष्ट्यांचे परिपूर्ण मिश्रण असलेली नवीन बोलेरो आणि बोलेरो निओ एक शक्तिशाली अनुभव देतात, जो शहरातील रस्त्यांवर आणि आव्हानात्मक भौगोलिक प्रदेशांमध्ये देखील सारखाच असतो.”