सोनाटा फेस्टिव्ह कलेक्शन 2.0 : उत्सवाला वाढवते नवी चमक

September 29,2025

नागपूर : उत्सवाचा हंगाम जवळ येताच सोनाटा आपल्या आकर्षक फेस्टिव्ह कलेक्शन 2.0 चे अनावरण करत आहे. वेळ आणि परंपरा साजरी करणारी ही घड्याळे भेटवस्तू देण्याचा आनंद द्विगुणित करतात. आधुनिक डिझाइन आणि उत्सवी भव्यतेचे अद्भुत मिश्रण असल्यामुळे हे कलेक्शन विशेष क्षण साजरे करण्यासाठी परिपूर्ण ठरते.

पुरुषांसाठीचे कलेक्शन – प्रत्येक घड्याळ समृद्ध डायल, बोल्ड केस बॅकड्रॉप, सोनाटाचे क्लासिक रोमन मार्कर आणि क्रोको-पॅटर्न स्ट्रॅप्ससह उठून दिसते. निळ्या व हिरव्या रंगातील आकर्षक डायल्स त्यांची मोहकता वाढवतात. क्रोनोग्राफ, मल्टी-फंक्शन डे आणि डेट, तसेच डायलवरील सूर्य-चंद्र निर्देशक यांसारखी वैशिष्ट्ये या घड्याळांना केवळ देखणेच नाही तर अत्यंत उपयुक्तही बनवतात. त्यामुळे हा संग्रह भेटवस्तू आणि खास क्षणांचे स्मरण करण्यासाठी आदर्श आहे.

महिलांसाठीचे कलेक्शन – जाळीदार ब्रेसलेट्स, चमकदार स्टड पीसेस आणि विविध आकारांच्या लिंक्ससह रोजगोल्ड पट्ट्यांची झळाळी या कलेक्शनची वैशिष्ट्ये आहेत. पॉलिश फिनिश आणि उत्सवाचे ग्लॅमर यामुळे प्रत्येक घड्याळ कोणत्याही पोशाखाला शोभून दिसते आणि विशेष प्रसंगासाठी उत्तम भेट ठरते.


या प्रसंगी सोनाटाचे उत्पादन प्रमुख निशांत मित्तल म्हणाले,

“फेस्टिव्ह कलेक्शन 2.0 म्हणजे उत्सव साजरे करण्याची स्टाईलिश पद्धत. प्रत्येक घड्याळ आनंद आणि उबदारपणाची अभिव्यक्ती आहे – तुम्ही ते स्वतः वापरा, भेट द्या किंवा सण साजरा करा, प्रत्येक प्रसंगासाठी ते योग्य आहे. हे कलेक्शन तुमच्या खास क्षणांमध्ये चमक आणेल आणि अविस्मरणीय आठवणी निर्माण करेल.”

सोनाटाचे फेस्टिव्ह कलेक्शन 2.0 हे देशभरातील सोनाटा स्टोअर्समध्ये तसेच www.sonatawatches.in

 वर ऑनलाइन उपलब्ध आहे. या आकर्षक घड्याळांसह तुमचे सण अधिक संस्मरणीय ठरतील.