फोटोकॉपी नही, ओरिजिनल दिखो” व्ही-जॉन तर्फे रणबीर कपूरसोबत नवीन जाहिरात मोहीम सादर

September 23,2025

गेल्या सहा दशकांहून अधिक काळ ग्रूमिंग क्षेत्रात आघाडीवर असलेल्या भारतातील प्रथम क्रमांकाचा शेव्हिंग क्रीम ब्रँड व्ही-जॉनने ब्रँड अ‍ॅम्बेसिडर रणबीर कपूरसोबत नवीन समग्र जाहिरात मोहिमेची घोषणा केली आहे. “फोटोकॉपी नही, ओरिजिनल दिखो”  (“फोटोकॉपी नाही, ओरिजिनल दिसा”) या प्रभावी कल्पनेवर आधारित ही जाहिरात मोहिम ग्रूमिंगकडे नुसती नक्कल करण्यापेक्षा वेगळा दृष्टीकोन देत एका अस्सल, प्रामाणिकपणाच्या आणि व्यक्तित्वाच्या दृष्टीने कृती म्हणून बघते. 


पिढ्यानुपिढ्या व्ही-जॉन भारतीय घरांमध्ये विश्वास, गुणवत्ता आणि सहज उपलब्धतेसाठी ओळखला जात आहे. या नवीन कॅम्पेनद्वारे ब्रँड आजच्या आत्मविश्वासाने भरलेल्या  आणि आता कुणाच्याही “कॉपी” बनू इच्छित नाहीत तर आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या लूकमध्ये, भावनांमध्ये आणि वागण्यातून ओरिजिनलपणे, स्वतंत्रपणे व्यक्त करू इच्छितात अशा भारतीय पुरुषांच्या आकांक्षा स्वीकारत आहे. 


मेगास्टार आणि या कॅम्पेनचा चेहरा असलेला अभिनेता रणबीर कपूर याच संदेशाला त्याचा खास करिष्मा आणि सुसंगती देत आहे. कॅम्पेनबद्दल बोलताना रणबीर म्हणाला: “आजच्या पिढीला नुसतं मिसळून जायला आवडत नाही तर त्यांना सर्वांमध्ये उठूनही दिसायचं असतं. ग्रूमिंग हा तुमची ओरिजिनॅलिटी, तुमचं स्वतःचं मूळ अस्तित्व व्यक्त करण्याचा महत्त्वाचा भाग आहे. व्ही-जॉन तरुणांना फोटोकॉपी होणं थांबवून स्वतःला स्वीकारायला सांगतो आहे हे मला खूपच भावलं आहे. आजच्या काळाबद्दल बोलणारी ही साधी पण ताकदवान कल्पना आहे.” 


या जाहिरातीची संकल्पना हॅवस क्रिएटीव्हची असून डेंटसु मिडिया सोबत भागीदारीत ही जाहिरात मोहीम टीव्ही, डिजिटल, प्रिंट आणि सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.  विनोद, ताजेपणा आणि तरुणाईची उर्जा दाखवत ही जाहिरात सादर होते. या कथानकात व्ही-जॉन केवळ एक शेव्हिंग ब्रँड नसून पुरुषांना त्यांची खरी ओळख व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करत आत्मविश्वास देणारा सहयोगी म्हणून सादर केला जातो.