गल्फ ऑइलने चाय - पकोडा राईड 2025 ला नागपुरात हिरवा झेंडा दाखवला, इंडिया बाइक वीकच्या सहकार्याने भारताच्या बाइकिंग संस्कृतीची तीन वर्षे

September 22,2025

* इंडिया बाइक वीक 2025 गल्फ ऑइलसोबतची भागीदारी मजबूत करते आणि 20+ शहरांमध्ये राईड्स आयोजित करण्याची योजना आहे 

* भारताची वाढती बाइकिंग संस्कृती आणि सामायिक अनुभवांबद्दल देशव्यापी सिग्नेचर राईड्स गल्फ ऑइलची वचनबद्धता बळकट करतात.

नागपूर : भारतातील आघाडीच्या ल्युब्रिकंट ब्रँडपैकी एक असलेल्या गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेड आशियातील सर्वात मोठा  मोटरसायकलिंग महोत्सव - इंडिया बाइक वीकचे (IBW) सलग तिसऱ्या वर्षी मुख्य प्रायोजक आहेत. या भागीदारीचे प्रतीक म्हणून त्यांनी बहुचर्चित चाय-पकोडा राइड 2025 च्या नागपूर आवृत्तीची सुरुवात केली. मोटारसायकलिंगद्वारे सौहार्द, साहस आणि सामुदायिक भावनेच्या रोमांचक उत्सवासाठी या वर्षीच्या राइड्सने एक व्यासपीठ तयार केले आहे. गेल्या दोन वर्षात, या भागीदारीमुळे 20 शहरांमधील 12000+ रायडर्स आणि मोटरसायकल उत्साहींना आकर्षित केले आहे. ज्यामुळे या राइड्स देशातील सर्वाधिक समुदाय-चलित बाइकिंग अनुभवांपैकी एक बनल्या आहेत.

यंदाच्या नागपूर राईडमध्ये 350+ बाईकर्स आऊटर रिंग रोडवरील साईराम ढाबा येथे एकत्र आले आणि नंतर कॅम्प चेरी फार्म, रामटेक येथे जाणाऱ्या 50 किमीच्या मार्गावर निघाले. या मार्गाने एकत्रिततेच्या भावनेसोबतच मोकळ्या रस्त्यांचा थरार अनुभवला. सुरक्षेवर लक्ष केंद्रित करून, गल्फने प्री-राईड ब्रीफिंग आणि सेफ्टी ड्रिलचे आयोजन केले होते, ज्यामध्ये अनुभवी आयबीडब्ल्यू मार्शलनी सहज समन्वय सुनिश्चित करण्यासाठी राईडचे नेतृत्व केले. प्रत्येक सहभागीला सेफ्टी राईडिंग गिअर देखील देण्यात आले होते, जे ब्रँडच्या सुरक्षित आणि जबाबदार राईडिंगची वचनबद्धता अधोरेखित करते. कार्यक्रमाचा समारोप गंतव्य स्थानावरील आव्हानात्मक आणि मजेशीर कार्यक्रमांनी झाला. मोटारसायकलिंगच्या एकत्रित थ्रिलचे क्षण यावेळी शेअर केले गेले.

या प्रसंगी गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. रवी चावला म्हणाले, “चाय-पकोडा राईड्स ही मोटार सायकलिंगप्रेमींसाठी एक आवडती गोष्ट बनली आहे. यंदा नागपूरला असाच आणखी एक अविस्मरणीय अनुभव देताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. इंडिया बाइक वीकसोबतची आमची सातत्यपूर्ण भागीदारी केवळ गतिशीलता वाढवण्यासाठीच नव्हे तर रायडर्सची आवड जपत त्यांना स्वातंत्र्य तसेच बंधुत्वाचे अनुभव देण्याची गल्फची वचनबद्धता दर्शवते. ग्राहकांना प्राधान्य देणारी कंपनी म्हणून, हे अनुभव आम्हाला लोकांची मानसिकता सांगतात आणि रायडर्सना गल्फची कामगिरी तसेच विश्वासार्हता खरोखर अनुभवण्यास सक्षम करतात. रायडर्सना लक्षात राहतील, तसेच त्यांचा आमच्यावर ठेवलेला विश्वास बळकट करतील, असे क्षण त्यांना देण्यासाठी गल्फ कटिबद्ध आहे.”

आता 12 व्या वर्षात, मोटारसायकल प्रेमींसाठी इंडिया बाइक वीकने देशातील प्रमुख उत्सव म्हणून स्वतःला दृढपणे प्रस्थापित केले आहे. हा एक असा कार्यक्रम आहे, जिथे रायडर्स एकमेकांशी जोडले जातात, त्यांचे अनुभव शेअर करतात आणि मोकळ्या रस्त्याबद्दलची त्यांची आवड वाढवतात. चाय-पकोडा राईड्स हा त्यांचा खास कार्यक्रम असून तो आता विस्तारतो आहे. ज्यामुळे बाईकर्सना निसर्गरम्य मार्ग एक्सप्लोर करण्याची, चहा आणि गप्पांच्या साहाय्याने हा बॉण्ड अधिक घट्ट करण्याची तसेच मोटारसायकलवरील प्रेम सातत्याने वाढवण्याची संधी मिळते.