उद्योग क्षेत्र सरकारचे बॅकबोन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

April 08,2024

* 'मिट & ग्रिट' कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी साधला संवाद

नागपूर : राज्यातील वर्तमान महा आघाडीची सरकार ही इंडस्ट्री फ्रेंडली आहे. मागील एक - दीड वर्षात आमच्या सरकारने राज्यातील व्यावसायिक आणि उद्योजकांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतलेले आहे. यामुळे राज्यात औद्योगिक विकासासोबतच लाखो युवकांना रोजगार मिळाला आहे. म्हणून औद्योगिक क्षेत्र हे सरकारचे बॅकबोन असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केले. ते नागपूर येथे आयोजित 'मिट & ग्रिट' या कार्यक्रमात बोलत होते.

विदर्भातील उद्योग क्षेत्र वाढविण्यासाठी आणि उद्योजकांचे कामकाज, त्यांच्या समस्या आदी विषयांवर मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याशी विदर्भातील उद्योजकांनी चर्चा केली. 

इंडस्ट्री असोसिएशन, भुटानी, आणि क्रियेटर्स युनायटेड २.०  यांच्या वतीने रविवारी (ता. ७) विदर्भातील उद्योजकांसाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 'मिट & ग्रिट' या कार्यक्रमाचे वर्धा रोड वरील द प्राईड हॉटेल येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार कृपाल तुमाने, दीपक अग्रवाल, दीपक सावंत आणि अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्या सरकार ने राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील लोकांसाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत.  या चर्चासत्राच्या दरम्यान ज्या काही सूचना, समस्या सर्व प्रमुख लोकांनी सांगितल्या त्यांचा बारकाईने अभ्यास करून लवकरच सोडविल्या जातील. मी मुख्यमंत्री आहे मात्र त्याआधी सामान्य नागरिक आहे. त्यामुळे मला सामान्यांच्या समस्या लवकर जमजतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज देशाची ११ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ५ व्या क्रमांकावर आलेली आहे. मोदींच्या नेतृत्वात देश महासत्ता होण्याच्या मार्गावर असल्याचेही ते म्हणाले. 

ते पुढे म्हणाले, विदर्भातील उद्योग क्षेत्र वाढविण्यासाठी सरकार तर्फे पूर्णपणे करण्यात येईल. उद्योजकांच्या कोणत्याही फाईलवर मुंबईत लवकर पास करून पाठविण्यात येतील. तसेच महिला उद्योजकांसाठी स्वतंत्र एमआयडीसी सुरू करण्यात येईल. तसेच बुटीबोरी एमआयडीसी मध्ये इलेक्ट्रॉनिक झोन उभारण्यात येईल. मिहानच्या  मुख्य कार्यालयात पूर्ण अधिकार असलेला एक अधिकारी बसविण्यात येईल. सोबतच पारशिवणी मध्ये सुध्दा नवीन एमआयडीसीचे कार्य लवकर सुरू असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नागपुरातील काही सोशल मीडिया एन्फ्ल्यून्सर चा सत्कार करण्यात आला. यात फूड ब्लॉगर नेहा रहाटे, शशांक गट्टेवर, लाईफ स्टाईल ब्लॉगर राज देवगुप्ता, पत्रकार दृष्टी शर्मा, मॉम ब्लॉगर प्रियांका जैन, सनातन ब्लॉगर सागर पांडे यांचा समावेश होता. यानंतर उद्योजकांनी आपल्या समस्या, प्रश्न, सुधारणा मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केल्या.