*सोनी सबवरील ‘आंगन - अपनो का’ मालिकेत आयुषी खुराणाच्या वडिलांची भूमिका साकारणारे महेश ठाकूर म्हणाले, आयुषी ही माझीच मुलगी असल्यासारखे वाटले; यामुळे पडद्यावर आमच्यातील जिव्हाळा अधिकच खरा अन् प्रेमळ दिसला*

November 21,2023मुंबई,  नोव्हेंबर 2023 : आपल्या आगामी ‘आंगन - अपनो का’ मालिकेच्या माध्यमातून सोनी सब प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे. या हृदयस्पर्शी कौटुंबिक नाट्यात आपल्या वडिलांप्रती मुलीचे अतूट प्रेम आणि समर्पणाची कहाणी चितारण्यात आली आहे. अभिनेत्री आयुषी

खुराणा पल्लवीची भूमिका साकारत आहे. ती एक सक्षम आणि स्वावलंबी मुलगी असून ती इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा आपल्या वडिलांना नेहमीच प्राधान्य देत असते. कसलेले अभिनेते महेश ठाकूर हे

तिचे वडील जयदेवची व्यक्तिरेखा साकारत आहेत. विवाहानंतर महिलांना सदोदित कौटुंबिक

जबाबदाऱ्यांचे अत्यंत नाजूक संतुलन ठेऊन झुंजत राहावे लागते, अशा जगात सोनी सबवरील ही ताजी मालिका पल्लवीच्या विवाहाविषयक अनन्यसाधारण दृष्टिकोनात डोकवून पाहायची संधी देते. पत्नी

होण्यासाठी महिलांना मुलगी बनणे का बंद करावे लागते, सामाजिक धारणेवरही ती प्रश्नचिन्ह उभे करते. पडद्यावरील बाप-लेकीच्या हृदयस्पर्शी अनोख्या संंबंधांच्याही पलीकडे जाऊन पडद्यामागील या दोन्ही


कलाकारांतील मैत्रीने त्यांच्या नात्यात अस्सलतेचा आणखी एक थर जोडलआहे.चित्रीकरणादरम्याअसीम हास्यविनोदासोबतच महेश ठाकूर हे आपल्या अनेक वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर आयुषीला

मोलाचे मार्गदर्शन करतात. मालिकेच्याही पलीकडे जाऊन दोघांत एक अस्सल बंध जुळले आहेत. मालिकेत जयदेव शर्माची भूमिका निभावत असलेले अभिनेते महेश ठाकूर म्हणाले की, “आपल्या पात्राप्रती आयुषीचे समर्पण आणि उत्साह खरोखरीच वाखाणण्याजोगा आहे. ती सेट्सवर अगदी सर्वांना

भारावून टाकणारी ऊर्जा घेऊन येते. यामुळे तिच्या चित्रीकरणाचा अनुभव आणखीच द्विगुणित होतो. एक प्रतिभावंत कलाकार असण्यासोबतच आयुषी ही अत्यंत विनम्र स्वभावाची आहे. ती अवतीभोवती असली की प्रफुल्लित असल्यासारखे वाटते. आता तर असे वाटू लागले आहे की ती माझी दत्तक कन्याच आहे! यामुळे पडद्यावरील आम्हा बाप-लेकीच्या क्षणांना अस्सलतेची आणखीच नवी झळाळी मिळते. आम्ही पडद्यावर साकारलेल्या या खऱ्याखुऱ्या नातेबंधाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहण्याची खूप उत्सुकता लागली आहे.” मालिकेत पल्लवी शर्माची व्यक्तिरेखा साकारत असलेली अभिनेत्री आयुषी शर्मा म्हणाली की, “महेश सरांसोबत या मालिकेचा एक भाग असणे हा अत्यंत सुखावणारा अनुभव आहे. ते एक कसलेले अभिनेते असून आपले पात्र खुरेखुरे वाटावे म्हणून कुठलेही बदल करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. ते आपल्या कामात किती ऊर्जा ओततात हे आपल्या प्रत्यक्षपणे पाहायला मिळते. ते आपले संचित ज्ञान देण्यासाठी नेहमीच तयार असतात. त्यांच्याकडून शिकणे हा मोठा आनंदाचा भाग असतो. दुसऱ्याला देण्यासाठी त्यांच्याकडे नेहमीच काही ना काही नवी गोष्ट असते.” 

लवकरच तुमच्या टीव्हीवर झळकणाऱ्या सोनी सबवरील आंगन-अपनो का मालिकेच्या ताज्या अपडेट्सइथे मिळवा!