सी -२० कार्यकारी समितीमार्फत माता अमृतानंदमयी यांचे भावपूर्ण स्वागत

March 19,2023

नागपूर दि. १९ : नागपूर येथे उद्यापासून होणाऱ्या सिव्हिल -20 इंडिया 2023 प्रारंभिक परिषदेच्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी यांचे भावपूर्ण स्वागत कार्यकारी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल रेडिसन ब्लू येथे केले.

नागपूर विमानतळावर जी-२० परिषदेअंतर्गत उद्यापासून आयोजित होणाऱ्या सी-२० परिषदेसाठी देश-विदेशातून आलेल्या प्रतिनिधींचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही बैठक ज्या ठिकाणी होणार आहे त्या हॉटेल रेडिसन ब्लू येथे माता अमृतानंदमयी यांची पारंपारिक पध्दतीने पाद्यपूजा करण्यात आली.यावेळी स्वस्ती वाचन करण्यात आले.

या मंगलमय सोहळ्याला सी -२० च्या कार्यकारी समितीचे सूस शेरपा डॉ. स्वदेश सिंह,जयंत कुलकर्णी,डॉ.पारिणिता फुके, रत्नाकर पाटिल, कमलाकांत पाठक, अजय धवले, साहिलजी,जयंतजी आदी उपस्थित होते.