Shiv Sena Dhanushyaban Symbol EC Hearing LIVE : धनुष्यबाण कुणाचा ठाकरेंचा की शिंदेंचा, आज अंतिम फैसला

January 20,2023

Dhanushyaban Hearing News : धनुष्यबाण (Dhanushyaban) कुणाचा ठाकरेंचा की शिंदेंचा याचा अंतिम फैसला आज होण्याची शक्यता आहे. (Shiv Sena) आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे.

Shiv Sena Dhanushyaban Hearing News : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी. (Maharashtra Political News) धनुष्यबाण (Dhanushyaban) कुणाचा ठाकरेंचा की शिंदेंचा याचा अंतिम फैसला आज होण्याची शक्यता आहे. (Shiv Sena) आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. (Uddhav Thackeray) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं यावर आयोग आजच निर्णय देण्याची शक्यता आहे. (Eknath Shinde) 17 जानेवारीला झालेल्या सुनावणीत आयोगासमोर कागदपत्रांवरून शिंदे आणि ठाकरे गटाने जोरदार युक्तीवाद केला. (Maharashtra News in Marathi) घाईघाईने निर्णय देऊ नये, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली होती. त्यामुळे आता आयोगाने आज पुन्हा सुनावणी ठेवलीय. आज आयोग निकाल देण्याची शक्यता आहे.