विद्यार्थ्‍यांनी घडविले मातीचे गणपती ‘ग्रीन गणेशा’ कार्यशाळेला उत्‍स्फूर्त प्रतिसाद

August 16,2022

प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्‍यासाठी व घरोघरी मातीच्‍या गणपतीची स्‍थापना व्‍हावी, या उद्देशाने ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्‍यावतीने आयोजित ‘ग्रीन गणेशा’ या कार्यशाळेला शहरातील विविध शाळांचा उत्‍स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्‍यांनी तज्‍ज्ञ मूतिकारांच्‍या मार्गदर्शनात देखणे मातीचे गणपती तयार केले.

‘ग्रीन गणेशा’ कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षक आमदार नागो गाणार यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले यांच्‍यासह आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, योगेश बन, किशोर भागडे, अनिल देव, अशोक सायरे, सुधीर कपूर, उपेंद्र वालदे, मनोज भालेराव, सचिन कावळे, अनुपमा सायरे, भाग्यश्री चन्ने, दीपाली ढोमणे इत्‍यादींची उपस्‍थ‍िती होती.

शनिवारी सकाळच्‍या सत्रात लालबहादूर शास्त्री मनपा हनुमान नगर, विनायक राव देशमुख लकडगंज, साऊथ पॉइंट स्‍कूल व दुर्गानगर मनपा शाळेतील विद्यार्थ्‍यांनी मातीचे गणपती तयार केले तर दुपारच्‍या सत्रात सोमलवार निकालस, प्रहार

रविनगर व ललिता पब्लिक स्कूलमध्‍ये कार्यशाळा घेण्‍यात आली. दोन दिवस ही कार्यशाळा घेण्‍यात येत आहे.
14 व 15 ऑगस्ट सकाळी 10 वाजता महात्मा गांधी जरीपटका, पं. बच्‍छराज व्यास मध्‍ये तर दुपारी 1 वाजता हिंदू मुलींची शाळा येथे ही कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली आहे.