श्रीकृष्‍ण संस्‍थेच्‍या प्रशिक्षण शिबिराला भरघोस प्रतिसाद

June 15,2021

नागपूर, : श्रीकृष्‍ण बहुउद्देशीय संस्‍था आणि महर्षि कर्वे शिक्षण संस्‍थेच्‍या संयुक्‍त विद्यमाने बचत गटाच्‍या महिलांसाठी नि:शुल्‍क ऑनलाईन पेपर बॅग प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले होते. या प्रशिक्षण शिबिराला बचत गटातील महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभला. महर्षि कर्वे संस्‍थेच्‍या प्राचार्य कृपा सावलानी व श्रीकृष्‍ण बहुउद्देशीय संस्‍थेच्‍या संचालिका संध्‍या भोयर यांनी हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. शॉपिंग बॅग, छोटे पाऊच असे पेपर बॅगचे विविध प्रकार शि‍कवण्‍यात आले. पेपर बॅग एक्‍सपर्ट शिवानी बोरीकर यांचे महिलांना मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्‍हणून संस्‍थेचे अध्‍यक्ष राजेश भोयर यांची विशेष उपस्थिती होती.