शुक्रवारी १८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

May 01,2021

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. ३० एप्रिल) रोजी १८ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,२८,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५१ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.