देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवारांची भेट, सर्वत्र चर्चेला उधाण

April 07,2021

मुंबई : ७ एप्रिल - मुंबईत स्फोटकांनी गाडी सापडल्याचे प्रकरण, सचिन वाझेंना  अटक, महाविकास आघाडीच्या  दोन मंत्र्यांचा राजीनामा या घडामोडींनी राज्यातील राजकारण ढवळून निघाले. आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे, असल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवास्थानी जाऊन फडणवीस त्यांची भेट घेणार आहे.  शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भात चौकशी करण्यासाठी फडणवीस भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस आज किंवा परवा भेट घेणार आहे.

शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे मागील आठवड्यात मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला असून सिल्वर ओक या निवास्थानी विश्रांती घेत आहे.