नागपुरात २४ तासात १२७६ रुग्ण ११ रुग्णांचा मृत्यू

March 08,2021

नागपूर : ८ मार्च - नागपूरसह विदर्भात सलग ५ व्या दिवशीही कोरोनाचा उद्रेक सुरूच असून गेल्या २४ तासात नागपुरात १२७६ बाधित रुग्ण आढळले तर पूर्व विदर्भात एकूण १७१० रुग्ण बाधित झाले आहे. २४ तासात नागपुरात ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

नागरिकांची बेफिकीरी ही कोरोनाला मदत करत असून त्यातूनच बाधितांची रुग्णसंख्या वाढली आहे गेल्या २४ तासात १२७६ रुग्ण आढळले असून १०३७ शहरात २३६ ग्रामीण आणि ३ जिल्ह्याबाहेरील आहेत. एकूण बाधितांची संख्या १५९००५ वर पोहोचली आहे.  नागपूर जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून ७ रुग्ण शहरातील १ ग्रामीण भागातील ३ इतर जिल्ह्यातील आहेत. आज नागपुरात ११०७६ ऍक्टिव्ह रुग्ण असून ८८६७ शहरात २२०९ ग्रामीण भागातील आहे शहरात ६६१४ चाचण्या झाल्या असून ५५३० शहरात १०८४ ग्रामीण भागात झाल्या