दूधाची भुकटी बनवणारा बंद कारखाना राज्यशासन सुरु करणार

April 03,2020

नागपूर, 3 एप्रिल -  भंडारा जिल्ह्यातील शेतकरी शेती व्यवसायासोबतच दूग्ध व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात दूध संकलन होत आहे. दुधापासून भुकटी तयार करण्याचा कारखाना दाभा येथे तयार होणार आहे. या  कारखान्याची खुद्द दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यामुळे विदर्भातील दुध उत्पादकांना मोठा फायदा मिळणार आहे.

भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादकांचा जिल्हा म्हणून परिचित आहे. शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून जिल्ह्यातील शेतकरी पशुपालनातून दुग्ध व्यवसाय करतात. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुध संकलन होत आहे. दुधापासून भुकटी तयार करण्याचा कारखाना दाभा येथे बंद अवस्थेत होता. परंतु आता नामदार सुनील केदार यांच्या पुढाकाराने तसेच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सदर बंद कारखान्याबाबत राज्याचे दुध व पशुसंवर्धन मंत्री यांच्या निर्देशनास आणून दिल्याने बंद पडलेल्या त्या कारखान्याला नवीन संजीवनी मिळाली आहे. नाना पटोले यांनी देखील दूध भुकटी कारखान्याचा व त्यासंबंधी नियोजनाचा आढावा घेतला. नाना पटोले यांनी दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने बंद असलेल्या कारखान्याचा प्रश्‍न रेटून धरला.

सुनील केदार यांनी प्रकल्पाला लागणारी तांत्रिक मदत व निधी देण्याचे अस्वस्थ करुन दोन दिवसात प्रकल्पाचे काम सुरु होईल. विदर्भातील दूध संकलन करुन प्रकल्पात आणले जाणार आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना फायदा  होणार आहे., या प्रकल्पाविषयी तंत्रज्ञांकडून व अधिकार्‍यांकडून माहिती घेऊन भंडारा जिल्ह्यातील एकमेव होत असलेला दूध भुकटी प्रकल्प सुरु होणार आहे.