यंदा प्रजासत्ताक दिनी सीताबर्डी किल्ला बंद

January 20,2021

नागपूर : २० जानेवारी - कोविड साथीची पार्श्वभूमी विचारात घेता व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दरवर्षी प्रजासत्ताक दिनी नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे.  सीताबर्डी किल्ला यंदा नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनी सीताबर्डी किल्ला नागरिकांसाठी खुला ठेवण्यात येतो. या दिवशी नागरिकही मोठ्या संख्येने किल्ला पाहण्यासाठी येतात. परंतु यंदा साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अंतर्गत कोविड-19 नियमावली 2020 व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार हा किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी  तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रविंद्र ठाकरे यांनी कळवले आहे.