पोलीस मुख्यालयात एकाच वेळी ३ अजगर दिसले

January 17,2021

गोंदिया : १७ जानेवारी - अंगावर काटे उभे करणारी घटना शहरातील कारंजा पोलीस मुख्यालयात घडली. येथे 3 अजगर साप आढळल्याने एकाच खळबळ उडाली. 

पोलिस मुख्यालयातील जुन्या हॉस्पिटलच्या इमारतीजवळ अनेक क्वार्टर खाली आहेत. या परिसरात मोठ्या संख्येने साप निघतात. त्यांच्या भीतीने लोक येथे येण्यास घाबरतात. पोलिस कॉलनीतील काही मुलांना एक मोठा साप दुपारच्या सुमारास दिसला. याची माहिती त्यांनी क्वार्टर इंचार्ज सहायक पोलिस निरीक्षक कमलाकर घोटेकर यांना दिली. यानंतर तात्काळ रेस्क्यू टीम 5 फुटची विशेष स्टिक घेऊन घटनास्थळी पोहचली. तसेच सुरक्षित अंतर ठेवत स्प्रिंग अॅनक्शन लागलेल्या खास स्टिकचा उपयोग करून अजगराला पकडून पोतीत घालण्यात आले.

 त्यानंतर परिसराची पाहणी केली असता पुन्हा दोन अजगर साप आढळल्याने त्यांना पकडण्यात आले. अशाप्रकारे तीन अजगर सापांना पकडून पोतीत बंद करण्यात आले. त्यानंतर वन विभागाची चमू आल्यावर त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या तीन अजगर सापांची लंबी अनुक्रमे 10, 8 व 7 फूट होती. तसेच वजन 8 ते 10 किलो दरम्यान होते. सदर रेस्कू ऑपरेशन पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात सर्पमित्र, पोलिस कर्मचारी कमलाकर घोटेकर, मोरेश्वर लोहारे, मुस्तफा अख्तर, श्रावण गेडाम, प्रवीण वाढीवे, नंदू राऊत, मंगेश शहारे यांनी केले.