ईडीच्या रडारवर शिवसेनेचे अजूनही काही बडे नेते

December 03,2020

ठाणे : ३ डिसेंबर - राज्यातील ठाणे जिल्हा हा सर्वाधिक आमदार असाणारा जिल्हा आहे. पालघर जिल्हा वेगळा झाला असला तरीही राजकीयदृष्ट्या तो भाग अजूनही ठाणे जिल्ह्यातच मोडतो. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि पक्षांच्या महत्त्वाच्या पदावर ठाणे जिल्ह्यातील व्यक्ती असतेच असते. राज्यातील सत्तेचे समीकरण बदलू शकतो, इतकी राजकीय ताकद या ठाणे जिल्ह्यात आहे. याच ठाणे जिल्ह्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपयर्ंत सुरु आहे कारण ठाण्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडींच सत्र सुरु केले आहे.

शिवसेना आमदार आणि ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती प्रताप सरनाईक यांच्यावर अंमलबजावणी संचनालयाने धाड टाकली आणि एक साधा रिक्षावाला नवकोट नारायण कसा झाला? या चर्चेला संपूर्ण ठाणेच नाही तर राज्यभरात उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इडीच्या या पाच टीम ठाण्याच्या दिशेने रवाना झाल्या होत्या. पण या पाच टीम ठाण्यात कुठे गेल्या? कोणावर यांनी धाडी टाकल्या? धाडी टाकण्या मागचे कारण काय? या सर्व बाबात ईडीने कमालीची गुप्तात पाळली होती. तर या धाडी पडताच ईडीच्या रडारवर ठाण्यातील शिवसेनेचे आणखी एक बडे नेते आहेत. ज्यांच्या खासम खास माणसावर ईडीने धाड टाकली आहे, या चर्चांना उधाण आलं आहे. 

काही अंशी ही गोष्ट खरी जरी असली तरीही ईडीनं मात्र याबाबत चकर शब्दही काढला नाही आहे. मात्र त्या व्यक्तीच्या घरी आणि कार्यालयात नेमकं काय सापडलं ते इडीने अजून जाहीर केले नाही आहे. पण त्या उद्योगपतीच्या घरी इडीने धाड टाकल्याने ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये कमालीची खलबतं होवू लागली आहेत.

हे मात्र नक्की. ते शिवसेनेचे बडे नेते कोण आहेत? अशी चर्चा आता राज्यभर होत आहे. तर येणार्या दिवसांमध्ये शिवसेनेतील आणि महाविकास आघाडीतील अजून काही नेते ईडीच्या रडारवर असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला कोंडीत धरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांन कडून वारंवार केला जात आहे. त्यामुळे येणार्या दिवसात अजून काही महत्त्वाच्या नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, गेल्या आठवड्यात प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कायार्ला व ईडीनं सर्च ऑपरेशन केलं. सरनाईक यांचे चिरंजिव विहंग सरनाईक यांची तब्बल पाच तास चौकशी करण्यात आली. तर प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. टॉप्स सिक्युरिटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी कडूनही कारवाई करण्यात आली आहे. याचं प्रकरणी विहंग सरनाईकची ईडीने पाच तास चौकशी केली.