उभ्या ट्रकला दुचाकीने धडक दिल्याने एका युवतीचा मृत्यू तर दुसरी गंभीर जखमी

December 03,2020

यवतमाळ : ३ डिसेंबर - ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या भांबराजा टोलनाक्याजवळ उभ्या ट्रकला दुचाकीने धडक दिल्याने एका युवतीचा मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही घटना आज सकाळी घडली. रोशनी चंदन गुप्ता (१६) असे मृत मुलीचे तर राणी चंदन गुप्ता (१४) असे जखमीचे नाव आहे. बेचखेडा येथून यवतमाळ येथे रोशनी व राणी या दोघी बहिणी दुचाकीने जात असतांना भांबराजा टोल नाक्याजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रोशनीने उभ्या ट्रकला धडक दिली. यात रोशनीचा जागीच मृत्यू झाला तर राणी ही गंभीर जखमी झाली. ह्या दोन्ही बहिणी आज यवतमाळ येथे शिकवणी वगार्साठी येत होत्या. या दरम्यान रोड लगत उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने रोशनीचा जाग्यावरच मृत्यू झाला. या घटनेनंतर उपस्तीत असलेल्या नागरिकांनी तातडीने दोन्ही बहिणींना जिल्हा रूग्णालयात उपाराकरिता दाखल केले, मात्र एकीचा मृत्यू झाला तर दुसरी मृत्यूशी झुंज देत आहे. ग्रामीण पोलिसांनी आज सकाळी घटनास्थळी पंचनामाकरून ट्रक चालकाविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आला.