नागपूर मेट्रोचा विस्तार करण्याचा मार्ग मोकळा ः अनिल देशमुख

November 21,2020

नागपूर मेट्रोचा विस्तार करून नरखेड,वर्धा, रामटेक व भंडारा ही शहरे जोडण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरु होती. आता या 333 कोटींच्या विस्तार प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. महामेट्रोने या संदर्भात सादर केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्यास नगरविकास विभागाने मान्यता दिल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

या प्रकल्पामुळे नरखेड,वर्धा, रामटेक व भंडारा ही शहरे जोडली जाणार आहेत. या मार्गावर ब्रॉडगेज मेट्रो धावणार आहे. या प्रकल्पांसाठी 333.60 कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाचे अर्थसहाय्य म्हणून 21 कोटी 30 लाख एवढी रक्कम बिनव्याजी कर्ज म्हणून देण्यास नगरविकास विबागाने मान्यता दिली असून तसा आदेश नुकताच काढण्यात आला असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. काटोल-नरखेड मार्ग हा सर्वात लांब म्हणजे 85.53 किमीचा असून यावर 11 स्थानके राहणार आहेत. भंडारा मार्ग 62.7 किमीचा असून यात 11 स्थानके राहणार आहेत. वर्धा मार्ग हा 78.8 किमीचा असून यात 8 स्थानके राहणार आहेत. रामटेक मार्गावर 8 स्थानके असून हा मार्ग 41.6 किमीचा राहणार आहे.