गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई, पकडला पावणेआठ लाखाचा मुद्देमाल

October 29,2020

गडचिरोली : २९ ऑक्टोबर - चामोर्शी तालुक्यातील दोन वेगवेगळय़ा ठिकाणी एकाच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेने राबविलेल्या धडक कारवाईत देशी दारूसह जवळपास पावणे आठ लाखांची किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मनोज तुळशिराम मेश्राम  (२४) रा. भेंडाळा व मोरेश्वर बालाजी गोहणे रा. फोकुर्डी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अवैधरित्या दारूची वाहतूक तसेच साठा केल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. माहितीच्या आधारे चामोर्शी तालुक्यातील फोकुर्डी येथील मोरेश्वर गोहणे यांच्या घरी धाड टाकून शौचालयात ३ लाख ४४ हजारांची देशी दारू जप्त करण्यात आली. तर दुसर्या घटनेत तालुक्यातील भेंडाळा येथे दुचाकीने दारूची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून सापळा रचून मनोज मेर्शाम यांच्या सुझुकी वाहनाची तपासणी केली असता वाहना ४ लाख २८ हजारांची देशी दारू आढळून आली. अशी दोन्ही मिळून पावण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली दादाजी करकाडे, निलकंठ पेंदाम, शुक्रचारी गवई, सुनील पुठ्ठावार, पुष्पा कन्नाके, सिद्धेश्वर बाबर आदी केली.