चोरीला गेलेला ट्रॅक्टर चोरासकट सापडला

October 29,2020

वर्धा : २९ ऑक्टोबर दलपतपुर येथील राजेंद्र अजाबराव कलाने यांच्या मालकीचा जॉन डियर कँपणीचा MH 29 BC 7056 क्रमांकाचा ट्रॅक्टर वाघोली येथील एका शेतात रोटावेटर मारण्यासाठी भाड्याने दिला होता. यावेळी ट्रॅक्टर हा पंकज दिवे या चालकाजवळ होता. ट्रॅक्टर मधील डिझेल सम्पल्याने त्याने ट्रॅक्टर हा रवी मुंदाने यांच्या शेतात उभा करून चालक डिझेल आणण्यासाठी गेला होता. नंतर यातील फिर्यादी राजेंद्र कलाने व चालक पंकज दिवे हे दोघेही डिझेल घेऊन शेतामध्ये आले परंतु त्यांना तेथे ट्रॅक्टर दिसून आला नाही. त्यांनी इतरत्र शोध घेतला परंतु ट्रॅक्टर दिसला नसल्याने अखेर कलाने यांनी ट्रॅक्टर चोरीस गेल्याची तक्रार तळेगांव पोलिसांत दाखल केली. याबाबत पोलीस निरीक्षक राविकुमार राठोड यांनी तपासाची सूत्रे हलवत ही जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक रवी मनोहर, व पोलीस उपनिरीक्षक धीरज राजूरकर यांच्याकडे सोपवली.

ट्रॅक्टर चे डिझेल संपले ही बाब फक्त चालकालाच माहिती होती शिवाय गाडीची चावी सुद्धा त्याच्याकडेच असल्याने त्यावर पोलिसांनाचा संशय बढवला.पोलिसांनी गाडीचा चालकाला संशयित म्हणून ताब्यात घेऊन त्याला न्यायालयात सादर केले असता दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली, पोलिसांच्या मागणीनुसार न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करत संशयित आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. यादरम्यान पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच चालक हा पोपटासारखा बोलू लागला, त्याने ट्रॅक्टर चोरल्याची कबुली दिली. डिझेल संपल्याने त्याने गावातीलच आपल्या मित्रांना फोन करून डिझेल ची व्यवस्था करण्यास सांगितले, त्यानुसार त्याने डिझेल विकत घेऊन आणखी एका मित्रासह असे तिघे जणांनी ट्रॅक्टर चोरून तो परसोडा शिवारात लपून ठेवला .याबाबत ची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रॅक्टर पंचासमक्ष ताब्यात घेतला.ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज राजूरकर, पोलीस उपनिरीक्षक रवी मनोहर, आशिष नेवारे, मंगेश मिलखे, रुपेश उगेमुगे,संजय शिंगणे, चालक राहुल अमोने, व होमगार्ड शुभम भोयर यांनी केली.तळेगांव पोलिसांनी आठ तासाच्या आताच य गुन्ह्याचा छडा लावून चोरीस गेलेला 5 लाख55 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.