गोळ्या झाडून एकाची हत्या करणार्‍या भाजप नेत्याच्या भावाला अटक

October 17,2020

बलिया, 17 ऑक्टोबर : गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात स्थानिक भाजपा नेत्याच्या भावाला अटक केली असून अन्य पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. यातील मुख्यआरोपी धीरेंद्र प्रताप सिंह याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार बलियातील रेवती पोलिस ठाण्यातंर्गत दुर्जनपूर येथे सरकारी दुकानाबाबत दोन गटात झालेल्या तणावादरम्यान आरोपीने जयप्रकाश उर्फ गामा पाल या व्यक्तीवर चार गोळ्या झाडल्या होत्या. यात त्याचा मृत्यू झाला. तसेच, डझनहून अधिक जखमी झाले. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी भाजपा नेत्याच्या भावाला अटक केली तर, पाच आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. घटनेनंतर राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष्य करत आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी सुरेशचंद्र पाल आणि पोलिस मंडळ अधिकारी चंद्रप्रकाश सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक ब्रिजभूषण यांनी घटनास्थळास भेट दिली असा यावेळी आरोपीविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश तपास अधिकार्‍यांना दिले. घटनेतील मुख्य सूत्रधार अद्याप पसार असून, त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती दिली. जिल्हाधिकारी हरिप्रताप साही यांच्य नुसार, आरोपींचा शस्त्रपरवाना रद्द करण्याची प्रक्रिया  सुरू करण्यात आली आहे.