थॉमस कांबळे यांचे निधन

September 30,2020

नागपूर : ३०सप्टेंबर -  आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व जोगेंद्र कवाडे यांचे सहकारी थॉमस कांबळे यांचे  मंगळवारी कोरोनाचे निधन झाले. ते 68 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली व मोठा आप्त परिवार आहे. 

 थॉमस कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ व सक्रिय कार्यकर्ते होते. दलित पँथरचे नागपूरचे अध्यक्ष होते. अनेक आंदोलनात सक्रिय होते. प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे अतिशय विश्वासू सहकारी होते.  कोरोना पॉझिटिव्ह आल्यापासून त्यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री 10.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.