आयपीएल वर सट्टा लावणाऱ्या दोन अड्ड्यांवर पोलिसांची धाड

September 30,2020

गोंदिया : ३० सप्टेंबर - आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या मुंबई इंडियन व रॉयल चॅलेंर्जस बंगलोरदरम्यान सुरु असलेल्या सामन्यावर आभासी पद्धतीने सट्टा चालविणार्या दोन जागेवर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धाड टाकून पाच बुकींवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याजवळून एकूण ४ लाख ७४ हजार १९0 रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २८ सप्टेंबर रोजी रात्री १0.३0 वाजता शास्त्री वॉडार्तील योगेश उर्फ मामा बंसोड याच्या घरी धाड टाकली. यावेळी तो मुंबई इंडियन व रॉयल चॅलेंचर्स बंगलोर दरम्यान सुरु असलेल्या सामन्यावर इंडियन इ्स ९ या खेळावर आभासी पद्धतीने सट्टा चालवित असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान योगेश बंसोड याने पुनीत पांडे नावाच्या क्रिकेट बुकीकडून विकत घेतलेल्या आयडीवर पैशाच्या स्वरुपातील पाइर्ंटवर विक्रम ठाकूर, अजय आर्या, मनिष मेर्शाम, अंकीत मेंढे, फिरोज तिगाला व अन्य काही लोकांची बाजी लावून मोबाईलवर जुगार खेळवित असल्याचे कबूल केले. त्याच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईल फोन, ५२ इंच एलईडी, सेटटॉप बॉक्स, एक डायरी, पेन असा ७0 हजार ५00 रुपयांचा मुद्येमाल जप्त केला. याप्रकरणी योगेश बंसोड याच्यासह जुगार खेळणार्या सर्व आरोपींवर शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच रात्री २ वाजताच्या सुमारास पोलिस पथकाने मच्छी मार्केटमधील एका भंगार दुकानात चाललेल्या आभासी आयपीएल क्रिकेट सट्टा अर्यावर धाड टाकली. 

याप्रकरणी सुजल राजेश चव्हाण (२0), सारंग मनसिंग चव्हाण (२७), मयंक रामअवतार गुप्ता (२९), किसनसिंग प्रदिप0सग चव्हाण (२७) यांना ताब्यात घेतले असता त्यांनी क्रिकेट माझा ११ या अँपवर क्रिकेट बेटींगचे आकडे पाहून अखिल, सँटी, हिट, शिवम यांच्याकडून पैसे घेऊन सट्टा खेळत असल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून पोलिसांनी ८ मोबाईल फोन, एलईडी टीव्ही, सेटटॉप बॉक्स, २ रिमोट, एक डायरी, ३ दुचाकी व रोख ११ हजार ४९0 रुपये असा एकूण ४ लाख ३ हजर ६९0 रुपयांचा मुद्येमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, पोलिस उपनिरीक्षक तेजेंद्र मेर्शाम, आनंद बिचेवार, पोलिस कर्मचारी लिलेंद्र0सह बैस, गोपाल कापगते, चंद्रकांत कर्पे, भुवनलल देशमुख, राजेश बढे, भुमेश्वर जगनाडे, रेखलाल गौतम, चित्तरंजन कोडापे, अजय रहांगडाले, सुजाता गेडाम, विनोद गौतम यांनी केली.