डॉ. उदय बोधनकर भाजप वैद्यकीय आघाडीचे प्रदेश मार्गदर्शक

September 30,2020

नागपूर : ३० सप्टेंबर - भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा  करण्यात आली. यात प्रदेश समन्वयक, सहसंयोजक, विभागीय संयोजक, सहसंयोजक व मार्गदर्शक मंडळ यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये नागपूरचे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे व आ. गिरीश महाजन यांनी केली.

डॉ. उदय बोधनकर हे विख्यात बालरोग तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. अत्यंत कमी वयात भारतीय बालरोग तज्ञांच्या संस्थेचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात आपला सहभाग देत आलेत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय संस्था कॉमहेडचे एक्झिकेटिव्ह डायरेक्टर म्हणून काम बघतात. त्यांच्या या सामाजिक सेवाकार्याची दखल घेत त्यांची प्रदेश कार्यकारणीवर नियुक्ती करण्यात आली. या कार्यकारणीचे मार्गदर्शक म्हणून डॉ. उदय बोधनकर यांच्यासोबत खा. डॉ. विकास महात्मे, खा. डॉ. प्रीतम मुंढे, खा. हिना गावित, खा. डॉ. सुभाष भामरे, खा. डॉ. भारती पवार, खा. डॉ. भागवत कराड आहेत. डॉ. बोधनकारांनी आपल्या नियुक्तीबद्दल केंद्रीयमंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांचे आभार मानले.