मशरूम खाल्याने 10 जणांना विषबाधा

September 28,2020

चंद्रपूर : २८ सप्टेंबर - शेतात उगवणारे विषारी मशरूम खाल्याने 10 जणांना विषबाधा झाल्याची घटना रविवार, 27 जुलै रोजी दूपारच्या सुमारास तालुक्यातील रुद्रापूर येथे घडली. समीर भोयर (22), शुभम भोयर (20), प्रनोती भोयर (17), चंद्रकला भोयर (34), तेजस्विनी कुकुडकर (13), दुर्गा कुकुडकर (11), सानिका कुकुडकर (15), दत्ता कळस्कर (5), वर्षा कळस्कर (25), विमल कळस्कर (50) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व रुद्रापूर येथील रहिवाशी आहे.

 घटनेच्या दिवशी रुद्रापूर येथील समीर भोयर यांच्या शेतात 2 किलो वजनाचे मशरूम डुंबरावर उगवले होते. या शेतात विविध जातीचे फळभाज्या लावल्या जातात. त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात केला जातो. टाळेबंदीच्या काळात जनता संचारबंदी असल्याने फळभाज्या व्यवहारात येणे कठीण झाले. परिणामी शेतात लावलेल्या भाजी पाल्यावर उपजीविका करण्याची वेळ निर्माण झाली आहे.

 समीर भोयर यांच्या शेतातील 2 किलोचे मशरूम घरी आणल्यानंतर परिसरातील लोकांना देण्यात आले. ही भाजी जेवणात खाल्यानंतर लगेचच उलट्या, पोटदुखी, फेस येणे आदी विकार सुरू झाला. विषबाधा झालेल्यांना सावली येथील ग‘ामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. यापैकी समीर भोयर, शुभम भोयर, प्रनोती भोयर, दुर्गा कुकुडकर, विमल कुकुडकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.