चौकीदारी करणाऱ्या तरुणाने उपासमारीला कंटाळून केली आत्महत्या

September 24,2020

यवतमाळ : २४ सप्टेंबर - झुल्याची चौकीदारी करणाऱ्या तरुणाने उपासमारीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घाटंजी शहरात घडली आहे. तरुण कोरोनामुळे घाटंजीत अडकून पडला होता. मिय्या मामू, असे मृत तरुणाचे नाव असून तो परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहे.

घाटंजी येथे संत मारोती महाराज यात्रा भरते. मिय्या मामू हा यात्रेतील झुल्याची चौकीदारी करत होता. या कामासाठी त्याला रोज २०० रुपये मिळत होते. मात्र, कोरोना काळात लॉकडाऊन सुरू झाल्याने तो तेथेच अडकून पडला. शिळ्या पोळ्या आणून खाण्याची त्याच्यावर वेळ आली होती. त्यामुळे, मिय्या मामूने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. यप्रकरणी पुढील तपास घाटंजी पोलीस करत आहे.