सार्वजनिक आरोग्य मंत्री उद्या नागपुरात घेणार परिस्थितीचा आढावा

September 24,2020

नागपूर : २४ सप्टेंबर - सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख हे नागपूर जिल्ह्यातील कोरोनाची सद्य:स्थिती व उपाययोजना यासंदर्भात उद्या शुक्रवार, 25 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा घेणार आहेत. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत हे दूरदृष्य प्रणालीमार्फत आढावा बैठकीत सहभागी होणार आहेत.

 आढावा बैठकीनंतर येथील कोविड रुग्णालयांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे अमरावती जिल्ह्यातील कोरोनासंदर्भात उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी अमरावतीकडे रवाना होतील.

 कोरोना विषाणूमुळे बाधित झालेले रुग्ण तसेच त्यांच्यावर वैद्यकीय उपचारासाठी उपलब्ध सुविधा याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख विभागातील भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय तसेच कोविड रुग्णालयांना भेट देऊन पाहणी करणार आहेत.

 आरोग्यमंत्री राजेश टोपे व गृहमंत्री अनिल देशमुख गुरुवार, 24 सप्टेंबर भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या दौर्यावर असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. सकाळी 12.30 वाजता भंडारा व सायंकाळी 5 वाजता गोंदिया जिल्ह्याचा आढावा घेतील. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत.