संघ मुख्यालयातही कोरोनाने दिली धडक

September 20,2020

नागपूर : २० सप्टेंबर - नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातील  ९ ज्येष्ठ प्रचारकांना   करोनाची लागण झाली आहे. संघाच्या एका विश्वसनीय सूत्राने ही माहिती दिली. ‘संघाच्या मुख्यालयात राहणारे ९ जण दोन ते तीन दिवसांपूर्वी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये बहुतांश जण ज्येष्ठ प्रचारक  आहेत. सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. शिवाय संपूर्ण मुख्यालय सॅनिटाइज करण्यात आलं आहे, असे त्यांनी सांगितलं.’

सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी येथेच राहातात. मात्र, प्रचारकांना  करोनाची लागण झाली तेव्हा ते मुख्यालयात उपस्थित नव्हते. संघाच्या मुख्यालयात जवळपास २० स्वंयसेवक राहतात,याशिवाय प्रवासात येणे-जाणे करणारेही येथे मुक्कामी असतात. याशिवाय काही कर्मचारीही आहेत.  असेही ते म्हणाले.

माहितीनुसार, ९ प्रचारकांना  करोनाची लागण झाल्याची माहिती ज्येष्ठ स्वंयसेवकाने सरसंघचालक मोहन भागवत यांना देण्यात आली आहे. सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. शिवाय मुख्यालय सॅनिटाइज करण्यात आलं आहे.

या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लागण झालेले सर्वच वयोवृद्ध म्हणजेच ७५ ते ८० या वयोगटातील किंवा ८० पेक्षाही अधिक वय असणारे आहेत. कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून येथे मुक्कामी असणाऱ्या सर्वांचीच नियमित तपासणी केली जाते. आणि नियमित औषधोपचारही केले जातात. ज्यांना कोरोनाची लागण झाली त्या सर्वांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती या सूत्राने दिली.