३८ वर्षीय इसमाची झोपेतच केली हत्या

September 20,2020

वर्धा : २० सप्टेंबर - तळेगाव शामजीपंत पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या वर्धमनेरी येथे रात्री एका युवकाने ३८ वर्षीय इसमाची झोपेत हत्या केल्याची घटना घडली. 

प्राप्त माहितीनुसार,यातील मृतक सुखदेव सलामे वय वर्षे ३८रा. वर्धमनेरी व आरोपी भगवंता वलके वय २८ वर्षे रा.वर्धमनेरी हे दोघेही जंगलातुन मोळी आणून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

मागील एक महिन्यापूर्वी आरोपी व मृतकात कुर्हाड चोरीवरून चांगलाच वाद झाला होता. ज्यात मृतकाने आरोपीला मारहाण केली होती.याचा राग मनात धरून गुरुवारला रात्री ७ वाजताचे दरम्यान मृतक हा घरी झोपला असतांना त्याच्या घरी जाऊन त्याचे डोक्यावर झोपेतच कुर्हाडीने वार करून जागीच ठार केले. 

आरोपीने घटनेनंतर पोबारा केला होता. यानंतर तो गावाशेजारी असलेल्या शेतामध्ये लपून बसला होता. याची माहिती मिळताच गावकर्यांची मदत घेत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.