गोंदियातील कार चोरी प्रकरणातील आरोपीला नागपुरात अटक

September 15,2020

नागपूर : १५ सप्टेंबर - गोंदियात कार चोरी करून नागपूरला आलेल्या आरोपीला पारडी पोलिसांनी अटक केली. आरोपीत प्रदीप उर्फ दादू ठाकूर (१९), रा. डिप्टी सिग्नल आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराचा समावेश आहे.

रविवारी दोघेही गोंदियाच्या डुग्गीपार येथे गेले होते. तेथे बजरंग अॅ्ग्रो इंजीनिअरिंग कंपनीसमोर उभी कार चोरी करुन नागपूरला आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पारडी सापळा रचला. वर्धमाननगरच्या रामदेवबाबा रुग्णालयासमोर आरोपींना पाठलाग करून पकडण्यात आले. ठाण्यात आणून चौकशी केली असता वाहन डुग्गीपार येथून चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी कार जप्त करून गोंदिया पोलिसांना माहिती दिली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निलोत्पल आणि एसीपी वालचंद्र मुंढे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि शरद शिंपने, सपोउपनि सुरेंद्र तिवारी, पोहवा राजेश तिवारी, नापोशि राजेश नाईक, नरेंद्र तिडके आणि शरद राघोर्ते यांनी केली.