मेट्रो पिल्‍लरवर सजला पोळा

January 18,2022

नागपूरच्‍या सौदर्यात पडली भर
सिमेंट रस्‍ते,  मेट्रो रेल्‍वे इत्‍यादींनी नागपूरचा झपाट्याने विकास होत आहे. सोबतच, शहराच्‍या सौंदर्यीकरणातही भर पडत आहे. कॉटन मार्केट चौकातील मेट्रो पिलरवर रविवारी आकर्षक मेटल शिट हे म्‍यूरल्‍स लावण्‍यात आले असून त्‍यावर पोळ्याचे सचित्र दर्शन नागपूरकरांना बघायला मिळणार आहे. ललित कला गुरू डॉ. विनोद इंदूरकर यांच्‍या मार्गदर्शनात हे पारंपरिक पोळा सणाचे वैशिष्‍ट्यपूर्ण म्‍युरल तयार करण्‍यात आले आहे. प्रसिद्ध शिल्‍पकार शंतनु इंगळे यांची त्‍यांना ही कलाकृती साकार करण्‍यात मोलाची मदत झाली आहे. याआधी छत्रपती चौक आणि सुभाष नगर चौकात विविध मध्‍यवर्ती संकल्‍पनावर आधारित म्‍यूरल लावण्‍यात आले असून त्‍यामुळे या चौकांच्‍या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.